करमाळा (सोलापूर) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंगळवारी (ता. २४) करमाळा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते करमाळ्यातील विविध विकास कामांचे भूमीपूजन होणार आहे. त्यानंतर झरे फाटा येथील राधेश्याम मंगल कार्यालयात त्यांच्या उपस्थितीत महिला व शेतकरी मेळावा होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष भरत अवताडे यांनी दिली आहे.
करमाळा बंद! बाईक रॅलीत मराठासह इतर समाजबांधव; महापुरुषांना पुष्पहार अर्पण करत जरांगेंना पाठींबा
उपमुख्यमंत्री पवार हे मंगळवारी सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे हेलिकॉप्टरने येणार आहेत. त्यानंतर कमलाभवानी देवीचे दर्शन घेऊन ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झरे फाटा येथे मेळाव्यासाठी जाणार आहेत. त्यांचे ठिकठिकाणी भव्य स्वागत होणार आहे. झरे फाटा येथे सावडी (जिल्हा हद्द) ते वेणेगाव या 71 किलोमीटर रस्त्याचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे असणार आहेत. आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजयमामा शिंदे यांच्यासह माजी आमदार जयवंतराव जगताप हे यावेळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी महायुतीतील घटक पक्षाची बैठक ते घेणार आहेत. या दौऱ्यानिमित्त श्रीदेवीचामाळ येथून बाईक रॅली काढली जाणार आहे, असे अवताडे यांनी सांगितले आहे.