आमदारकी नसली तरी विकास कामे सुरूच राहणार; माजी आमदार शिंदे यांचे राजुरीत विधान

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वीज प्रश्न सोडविण्यासाठी माझ्या काळात तीन नवीन वीज उपकेंद्र व सुमारे 15 वीज उपकेंद्राचे क्षमतावाढ करून घेतली. त्यामुळे वीज प्रश्न सुटण्यामध्ये यश मिळाल्याचा आनंद आहे. यापुढेही आमदारकी नसली तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून विकास कामे सुरूच ठेवणार असून तुम्ही निश्चित रहा, असे विधान माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी राजुरी येथे केले आहे.

33 /11KVA च्या वीज उपकेंद्राचे लोकार्पण आज (सोमवार) झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे होते. आमदारकीच्या कार्यकाळात तालुक्याचा वीज प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केला. जात किंवा भावनेवर मी मत मागितले नाही, असे माजी आमदार शिंदे म्हणाले. नंदकुमार जगताप, आरआर बापू साखरे यांनी शिंदे यांच्या कामाचा लेखाजोखा मांडला.
माजी आमदार शिंदे यांच्याकडून ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाच्या कोसळलेल्या भागाची पहाणी

जेष्ठ नेते वामन बदे, ॲड. नितीनराजे भोसले, सतीश शेळके, जिल्हा दूध संघाचे संचालक अशोक पाटील, बाजार समितीचे माजी संचालक चंद्रकांत सरडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, वाशिंबेचे सरपंच तानाजी झोळ, युवा नेते अजिंक्य पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उध्दव माळी, डॉ. गोरख गुळवे, भरत खाटमोडे, निळकंठ अभंग, आण्णासाहेब पवार, राजेंद्र बाबर, अशोक तकीक, अनिल शेजाळ, अनिल केकान, सचिन गावडे, शंकर कवडे, उदय पाटील, उमेश इंगळे, बापू तांबे, स्वप्निल पाडूळे, संजय साखरे, भाऊसाहेब साखरे, उदय साखरे, नवनाथ दुरंदे, आत्माराम दुरंदे, आप्पा निरगुडे, धनंजय जाधव, संजय साखरे, सुनिल पाटील, नवनाथ साखरे, आप्पा टापरे, वसंत भोईटे, दादा साखरे, संदिपान साखरे, आबा साखरे, दत्तू बोबडे, डॉ. फाळके, विठ्ठल देशमुख, प्रविण साखरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *