करमाळा (सोलापूर) : आषाढी एकादशीनिमित्त संगोबा येथे श्री आदिनाथ महाराज मंदिरात परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. येथे सोलापूरसह धाराशिव व नगर जिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी येतात. परिसरातील अनेक भक्त दिंड्यांच्या माध्यमातून चालत येथे दर्शनासाठी येतात. सीना नदीच्या काठावर देवस्थान आहे. मात्र यावर्षी पाऊस लांबल्याने भाविकांची पाण्यासाठी गैरसोय झाली. येथे प्रत्येक एकादशीला भाविक दर्शनासाठी येतात. त्यांची पाण्यासाठी गैरसोय होऊ म्हणून प्रशासनाने व्यवस्था करावी, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी केली आहे.
