Mama Hai To Mumkeen Hai Feelings of the villagers of Korti Kuskarwadi

करमाळा (सोलापूर) : राज्य सरकारच्या अल्पसंख्यांक विकास विभागाच्या वतीने अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण व नागरी क्षेत्रात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दोन कोटी 25 लाख निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली आहे.

आमदार शिंदे म्हणाले, मंजूर निधीमधून करमाळा तालुक्यातील पश्चिम सोगाव व कंदर येथे कब्रस्तान वॉल कंपाऊंड बांधणे व सुशोभीकरणसाठी प्रत्येकी 7 लाख, कंदर येथे ईदगाह वॉल कंपाउंड व परिसर सुशोभीकरणसाठी 7 लाख, केम येथे रेल्वे लाईन लगत कब्रस्तान वॉल कंपाउंड तसेच मुलाणी कोपरा ते पोपट खरवडे रस्ता सिमेंट काँक्रेटसाठी 5 लाख, साडे येथे कब्रस्तान परिसर सुधारणा व पाणीपुरवठासाठी 7 लाख, वडगाव येथे कब्रस्तान परिसर सुधारणा व पाणीपुरवठासाठी 7 लाख, पुनवर येथे कब्रस्तान वॉल कंपाऊंडसाठी 5 लाख, गुळसडी येथे पीरसाहेब दर्गा समोर सभा मंडप बांधणेसाठी 10 लाख, वाशिंबे येथे कब्रस्तान परिसर सुशोभीकरणसाठी 7 लाख, आवाटी येथे कब्रस्तान वॉल कंपाउंड व सुशोभीकरणसाठी 7 लाख, दिवेगव्हाण येथे कब्रस्तान परिसर सुधारणा व पाणीपुरवठासाठी 7 लाख,

कामोणे येथे पीर देवस्थान समोर सभामंडपसाठी 7 लाख, जातेगाव येथे मेहबूब सुभानी दर्गा (शब्बीर पठाणचे शेतात) सभामंडपसाठी 7 लाख, उमरड येथे कब्रस्तान वॉल कंपाऊंड व मदरसा जवळील परिसर सुशोभीकरणसाठी 10 लाख, रावगाव येथे मज्जित जवळील परिसर सुशोभीकरणसाठी 7 लाख याबरोबरच करमाळा शहरातील मौलाली माळ येथे ईदगाह मैदान परिसर शुभीकरण व वॉल कंपाऊंडसाठी 15 लाख, मा आयशा मज्जित व मदरसा मोहल्ला गल्ली येथे सभा मंडपसाठी 10 लाख, मुलाणवाडा दफनभूमी रावगाव रोड वॉल कंपाउंडसाठी 10 लाख, फारूक जमादार घरासमोर सिमेंट काँक्रीट व पेविंग ब्लॉकसाठी 7 लाख, सुलेमानी मज्जित (आनंद बाग रोड) समोरील रस्ता कॉंक्रिटसाठी 7 लाख मंजूर झाले आहेत. माढा तालुक्यातील कुर्डूवाडी येथे नगरपालिकामागील कब्रस्तान वॉल कंपाउंड बांधणेसाठी 65 लाख, टेंभुर्णी रोड लगत ईदगाह मैदान पेविंग ब्लॉक बसविणेसाठी 10 लाख असा निधी मंजूर झाला आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *