सोलापूर : शालेय शिक्षण विभागंतर्गत शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर विभागाकडील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित/अंश:त अनुदानित/विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित सलंग्न सर्व शाळेवर कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रकारच्या तक्रारी व अडचणी असतात. सदर तक्रारी व अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयाच्या वतीने महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी दुपारी 3 वाजता हरिबाई देवकर प्रशाला येथे संवाद दिन आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने संवाद दिन आयोजन अर्ज स्विकृतीचे निकष प्राप्त निवेदनावर कार्यवाही व इतर अनुषंघीक बाबीचा तपशिल सर्व संस्था/प्रशालेस कळविणेत आलेला आहे.

वरील प्रमाणे जिल्हातील सर्व शिक्षक/ शिक्षकेत्तर संघटना, इतर शिक्षण विभागाशी निगडीत संघटना यांना आवाहन करण्यात येते की, संवाद दिना दिवशी उपस्थित राहून आपले निविदेन व इतरव्यवहार दयावे. तसेच संवाद दिना करीता उपस्थित राहणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या परवानगीने रजा मंजूर करुन घेवून उपस्थित रहावे, असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि. प. सचिन जगताप यांनी सांगितले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *