करमाळा (सोलापूर) : उजनीच्या काठावरील गावात शेतीसाठी आठ तास वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
माजी अध्यक्ष बागल यांनी म्हटले आहे की, उजनी जलाशयात दीड महिन्यात सव्वातीन मीटर पाणी वाढले आहे. पुणे जिल्ह्यात धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणी पातळी वाढत असून शेतकऱ्याचा वीज पुरवठा सुरळीत करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात टंचाईमुळे वीज पुरवठा कपात करण्यात आला होता. आठ तासावरून सहा तास वीज दिली जात होती. आता पाणी वाढत असून सहा तासावरून आठ तास वीज देण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे.