करमाळा (सोलापूर) : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने झरे, खडकेवाडीच्या शेतकऱ्यांना कुकडी डावा कालवा भुसंपदान भरपाई लवकरच मिळणार असलेची माहिती भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.
चिवटे म्हणाले, कुकडी डावा कालवा २४५ किमी करिता झरे व खडकेवाडीच्या शेतकऱ्यांना भु संपदान भरपाई लवकरच मिळणार आहे.यासंदर्भात खासदार निंबाळकर यांनी शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी केलेल्या या प्रयत्नाला आता यश आले आहे.प्रांतधिकारी प्रियांका आंबेकर यांनी यासंदर्भात संबंधित शेतकऱ्यांना तलाठी यांचेमार्फत नोटीसा बजावून अहवाल लवकर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.