करमाळा (सोलापूर) : दलित सेना महिला आघाडीच्या अध्यक्षा निलावती कांबळे यांच्या हस्ते दिपावली निमित्त गोरगरीब, विधवा, परित्यक्ता व निराधार वृद्ध महिलांना साखर, मैदा व रवाचे वाटप करण्यात आले. हा लाभ घेण्यासाठी अनेक लाभार्थी उपस्थित होत्या. ‘महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. स्वतः पुढे येऊन घरगुती छोटे उद्योग सुरू करावेत. यासाठी काही स्वयंसेवी संस्थांची मदत आपण घ्यावी. म्हणजे समाजासाठी आपण आदर्शवादी ठराल,’ असे मत निलावती कांबळे यांनी व्यक्त केले. आदित्य भोसले, बबिता त्रिंबके, लक्ष्मी भोसले, कमल महाडिक, लक्ष्मण पवार, मनोज बोबडे, श्रेयश बोबडे व मतीन दळवी यावेळी उपस्थित होते.

