करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील टाकळी येथे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते जलजीवन मिशन योजनेचे भूमीपुजन झाले. बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे उपाध्यक्ष यावेळी उपस्थित होते.

शुक्रवारी (ता. ९) हे भूमीपूजन झाले. प्रास्ताविक गुळवे यांनी केले. गुळवे म्हणाले, गावातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन लोकवर्गणी करत संपूर्ण गावात मुरमी करण करत अश्वासन पूर्ण केले आहे. टाकळीतील आठवडी बाजाराच्या जागेबाबतचा प्रश्न गुळवे यांनी मांडला. त्यावर आमदार शिंदे यांनी कंदरप्रमाणे येथे आठवडी बाजार भरेल असे नियोजन करण्याचे अश्वासन दिले आहे. राष्ट्रवादीचे नेते आजित दादा पवार, आमदार रोहीत पवार यांच्या माध्यमातून डीकसळ पुलासाठी निधी मिळाला आहे. आमदार शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम लवकरच होईल, असा विश्वास व्यक्त केला.

अॅड. अजित विघ्ने म्हणाले, आमदार शिंदे यांच्या माध्यमातून तालुक्यात विकास कामे केली जात आहेत. त्याच जोरावर शिंदे २०२४ ला आमदार होतील.

सामाजिक कार्यकर्ते सुहास गलांडे म्हणाले, ‘मीशन जल जीवन योजनेचे काम चांगले करुन घ्या. ८८ लाख रुपयांच्या या योजनेचे सोने करुन घ्या. याला निधी सरकार देत असले तरी हा पैसा आपल्या खिशातुन जाणार आहे. याची जाणीव ठेऊन काम करुन घ्या, असे सामाजिक कार्यकर्ते सुहास गलांडे यांनी सांगितले आहे. डिकसळ पुलाचे काम विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या माध्यमातून आमदार संजयमामा शिंदे यांनी मंजूर करुन घेतले आहे. हे काम झाल्यानंतर २०२४ मध्ये मामा तुम्हाला प्रचंड मंत मिळवून दिली जातील. नवीन पुल होणार असला तरी जुन्या पुलाची दुरुस्ती व्हावी म्हणून अडीच कोटीची मागणी केली आहे. शिंदे बंधू हे कमी बोलून कामे जास्त करतात. येथे ऊसाची अडचण नाही. गुळवेंच्या माध्यमातून तो प्रश्न सुटला आहे, असे गलांडे यांनी सांगितले आहे.

यावेळी गौरव झांजुर्णे, नागनाथ लकडे, सुग्रीव धोडमीसे, राजेंद्र धांडे, उद्धव माळी, मोहन गुळवे, हरीभाऊ गुळवे, गणेश कोकटे, पोपट कर्चे, सुनिल ढवळे, गणेश जाधव, मनोहर हंडाळ, दतात्रय लाळगे, अविनाश मोटे, सुनिल तानवडे, तानाजी पानसरे, नितीन इर्चे, संतोष गुळवे, रयत क्रांतीचे जिल्हाध्यक्ष संतोष वारगड, हभप झेंडे महाराज, संतोष झेंडे, संतोष जाधव, अविनाश मोरे, सरपंच शरद भोसले, सोमनाथ पाटील, बापू जाधव, दिलीप गलांडे, अॅड. रविंद्र कोकरे, भारत धायगुडे, जालिंदर कोकरे, रोहिदास गिरंजे, सुनिल शितोळे, भरत धायगुडे, सतिष कोकरे, राजाभाऊ कोकरे आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन विलास दोलतडे यांनी केले.
