करमाळा (सोलापूर) : द बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा करमाळाच्या वतीने शुक्रवारी (ता. 6) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. सिद्धांत वाघमारे व प्रदीप कांबळे यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे पुष्पअर्पण करून बौद्ध वंदनेला सुरुवात झाली. सर्व बौद्ध उपासक, उपासिका यांच्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन करण्यात आले. यावेळी लहान मुलांचे व मुलींची भाषणे झाली. राजरत्न आंबेडकर हे द बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळ्यात काम केले जाते.
करमाळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
