करमाळा (सोलापूर) : येथील माजी नगरसेवक डॉ. अविनाश घोलप यांचे चिरंजीव डॉ. हृतिक घोलप यांची एमडी बालरोग तज्ञसाठी निवड झाली आहे. नीट पीजीमधून एमडी बालरोग तज्ञसाठी एनकेपी साळवे मेडिकल कॉलेज व मंगेशकर हॉस्पिटल नागपूर येथे त्यांची निवड झाली आहे. त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण सोलापूर येथील अश्विनी मेडिकल कॉलेजमध्ये पूर्ण झाले. त्यांची बालरोग तज्ञसाठी निवड झाल्याने करमाळा तालुक्यात सर्व डॉक्टर्सकडून अभिनंदन करण्यात येत आहे. डॉ. अविनाश घोलप यांचे करमाळा येथे महात्मा गांधी विद्यालयाच्या मागे घोलप हॉस्पिटल आहे.
डॉ. हृतिक घोलप यांची एमडी बालरोग तज्ञसाठी निवड
