करमाळा (सोलापूर) : गुरुकुल पब्लिक स्कूल येथे आषाढी एकादशीनिमित्त बाल दिंडी काढण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये नर्सरी ते दहावीचे 1 हजार 175 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी गुरुकुलचे बाल रिंगण व पांडुरंगाची गाणी सादर करण्यात आली.

125 students of Gurukul Public School made an idol of Panduranga

त्यामध्ये विठ्ठल कार्तिक खंडागळे, रुक्मिणी सानिका लावड व शहा, संत ज्ञानेश्वर अमरनाथ चिवटे, संत तूकाराम तरेश थोरात, कीर्तनकार अवधूत पवार, तबलावादक अथर्व मोरे, हरिपाठ युद्ध वीर नलवडे, अभंग स्वराली जाधव, मेघराज शिंदे, गवळण समृद्धी राखुंडे, सृष्टी जाधव, संस्कार हजारे व गुरुकुलचे शिक्षक जमदाडे तसेच टाळकरी, झेंडेकरी सेवेकरी, वारकरी, तुळशी घेऊन फुगडी खेळताना मुली व महिला पालक, तसेच बाल वारकरी या सर्वांनी वाखरीच्या रिंगणाप्रमाणे गुरुकुल पब्लिक स्कूलचे रिंगण शाळेमध्ये सादर केले. सूत्रसंचालन भांडवलकर यांनी केले. एचओडी शिंदे, एचओडी पवार, ओव्हाळ, दास व सर्व शिक्षक वृंद यांनी सर्व कार्यक्रमाचे नियोजन केले. आभार साबळे यांनी मानले. भोगे यांनी सर्व पालकांचे मनापासून आभार व्यक्त केले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *