करमाळा (सोलापूर) : भाजपाच्या वतीने ‘मोदी@9’ जनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी जेऊर येथे भुषण लुंकड यांच्या निवासस्थानी भेट देऊन व्यापाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी व्यापाऱ्यांनी त्यांच्या अडचणी त्यांना सांगितल्या. त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विनोद गरड, माजी ग्रामपंचायत सदस्य मुबारक फकीर, सुवर्णकारध्यक्ष अमोल महामुनी, प्रवासी संघटनेचे व नाभिक संघटनेचे अध्यक्ष सुहास सूर्यवंशी, व्यापारी प्रवीण अशोक माळवे, अतुल घाडगे, भूषण लुंकड, रवी माळवे, गणेश आमृळे, नितीन मंडलेचा, प्रवीण करे, बाबू महामुनी, दत्ता मारकड, नितीन घोडके, अक्षय किरवे, गाईंवर पेंटर, ओंकार वेदपाठक उपस्थित होते.


