करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे माजी माजी नगरसेवक संजय सावंत यांच्या माध्यमातून सावंत गल्लीसह परिसरात टँकरने पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. सोमवारी (ता. २६) हा पाणीपुरवठा सुरु करण्यात आला असून यामुळे नागरिकांनी दिलासा मिळाला आहे. करमाळा शहरात पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. त्यावर सावंत यांनी मार्ग काढला असून टँकरने पाणी पुरवठा सुरु केला आहे.
