करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील जेऊर ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात पाटील गटाने विजयाची हॅट्रिक केली आहे. ग्रापमपंचायत निवडणुकीच्या तीनही टप्प्यात आघाडीवर राहून सर्वात जास्त ग्रामपंचायतीवर सत्ता हस्तगत केल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी स्वतः दिली.
याबाबत माजी आमदार नारायण पाटील म्हणाले, की २०१९ नंतर माझ्या हाती तालुक्याची सत्ता नसतानाही नागरिकांचा विश्वास कायम टिकून आहे. मी आमदार म्हणून केलेल्या कामांची ही पोचपावती असून मी नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. ग्रामपंचायत निवडणुकीच्या या टप्प्यात आमच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी स्वतंत्र तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवर युती व आघाडी करून निवडणुका लढवल्या. यामध्ये बहुतांश ठिकाणी यश आले असून १६ पैकी ८ ग्रामपंचायतीवर आमच्या कार्यकर्त्यांच्या हाती तेथील जनतेने सत्ता दिली आहे. यामध्ये जेऊर, चिखलठाण, राजुरी, भगतवाडी- गुलमरवाडी, कंदर, रावगाव, कावळवाडी, केम या ठिकाणी सत्ता मिळाली असून गौडरे येथे सरपंचपद वगळता इतर सर्व जागी पाटील गटाचे सदस्य निवडून आल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.