करमाळा : माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमदेवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सभेला प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. गेल्या सोमवारी (ता. २२) करमाळ्यात त्यांच्या प्रचारार्थ सभा झाली होती. या सभेला मतदारांनी पाठ फिरवली होती. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केले जाऊ लागले आहेत.
महाविकास आघाडीकडून भाजपमध्ये बंडखोरी करून धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारी मिळवली होती. त्यानंतर काल शरद पवार यांच्या सभेसाठी मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर भाजपचे उमेदवार निंबाळकर यांच्या सभेतील रिकाम्या खुर्चीचे फोटो व्हायरल केले जाऊ लागले आहेत. निंबाळकर सध्या बॅकफूटला जाऊ लागले आहेत. मोहिते पाटील यांनी प्रचारातही आघाडी घेतली असून निंबाळकर यांना सभेसाठी गर्दी करणे हे आवाहन असणार आहे.
आमदार संजयमामा शिंदे हे निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. त्यांनी सांगितल्याबरोबर कार्यकर्तेही हजर राहत आहेत, मात्र निंबाळकर यांच्यावर नाराजी वाढत चालली असून त्यांच्या सभांनाही गर्दी होत नसल्याची चर्चा सुरु झाली आहे. बागल गट देखील शेतकऱ्यांचे पैसे मिळल्यानंतर सक्रिय होईल, पण त्याचा परिणाम कसा होईल, हे पहावे लागणार आहे.