करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभेचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा तालुक्यात प्रचार दौरा सुरु केला आहे. या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे आमदार शिंदे गटाचे समर्थक सुजित बागल यांनी सांगितले आहे.
आज (शनिवारी) केत्तुर, पारेवाडी, टाकळी, पोमलवाडी भागात हा दौरा असून सकाळपासून नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन केलेल्या विकास कामांबद्दल माहिती दिली जात आहे. याला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण तालुक्यात शिंदे गट आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रचारासाठी सक्रिय झाला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यावेळी वाशिंबेचे सरपंच तानाजी झोळ, डॉ. गोरख गुळवे, सूर्यकांत पाटील, राजेंद्र बाबर आदी उपस्थित होते.