करमाळा (सोलापूर) : ‘गणेश चिवटे यांच्या नेतृत्वात करमाळा तालुक्यातील भाजपा संघटन मजबूत झाले आहे. त्यांना आता तालुक्याचे राजकीय नेतृत्व करावे व तालुक्यातील शेतकऱ्यांनी देखील अडीअडचणी सोडविण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी केले.

भाजप किसान मोर्चाच्या वतीने झरे येथे शेतकरी मेळावा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेश चिवटे होते. ‘आपण करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असून भाजपा सरकार हे शेतकरी हिताचे असून हे सरकार सत्तेत आल्यापासून शेतकरी हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले गेले आहेत. यामुळे कोट्यावधीची मदत शेतकऱ्यांना मिळाली आहे. शेतकरी हितासाठी आपण यापुढे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत सरकारच्या योजना पोहोचवणार आहे’, असे यावेळी त्यांनी सांगितले.

भाजपाचे तालुका उपाध्यक्ष उमेश मगर, बंडू शिंदे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल पवार यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन जिल्हा चिटणीस विनोद महानवर यांनी केले तर आभार किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष सोमनाथ घाडगे यांनी मानले. कार्यक्रमासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, माळशिरसचे बाळासाहेब वावरे, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, नितीन झिंजाडे, बिटरगावचे माजी सरपंच डॉ. अभिजीत मुरूमकर, सहकार सेलचे तालुकाध्यक्ष आजिनाथ सुरवसे, संतोष कुलकर्णी, लक्ष्मण शेंडगे, बिभीषण गव्हाणे, हनुमंत रणदिवे, गणेश माने, हरिभाऊ झिंजाडे, विष्णू रंदवे, दौलत वाघमोडे, हर्षद गाडे, समाधान कांबळे, अशोक ढेरे, प्रकाश ननवरे, सुनिल जाधव, सुनील नेटके, नितीन निकम, संदिप काळे, दत्ता एकाड, दादा गाडे, ईश्वर मोरे, किसान मोर्चाचे गणेश परदेशी, जयसिंग भोगे, शिवाजी नाळे, अनिल गायकवाड, हर्षल शिंगाडे, अमोल दुरंदे, शिवाजी बोराडे, मोहन नेटके, बाबु गायकवाड, गणेश वाळुंजकर, बापू मोहोळकर यांच्यासह झरे येथील भरत भाऊ घाडगे, नानासाहेब घाडगे, हनुमंत शिंदे, खंडू पिसाळ, शंकर घाडगे, बाबू व्यवहारे, राम गुळवे, किरण शिंदे, प्रविण शिंदे, उत्तरेश्वर शेळके, नाना कांबळे, माजी सरपंच शिवाजी पिसाळ, राजू गायकवाड, शिवाजी ढावरे, विजय ढावरे, विठ्ठल घाडगे, शिवाजी कांबळे, हनुमंत मावलकर, बापू जाधव, सोमनाथ घाडगे, दादासाहेब दुरगुडे , तुकाराम चौधरी, सुहास चौधरी यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व झरे पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *