करमाळा (अशोक मुरुमकर) : येथे बागल यांच्या निवासस्थानी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आज (रविवारी) खासदार निंबाळकर यांच्या उपस्थितीत पदाधीकार्यांची बैठक झाली.

करमाळा तालुका व येथील सर्व मतदार सर्वसामान्य जनता हे माझं एक कुटुंब आहे. करमाळ्यासह सर्व मतदार संघातील विविध विकास कामांच्या माध्यमातून सातत्याने संपर्क ठेवत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक प्रामाणिकपणे केलेली आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी व आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीत संधी द्या, असे आवाहन खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी आज करमाळा येथे व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंग केदार, भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष व साखर संघ संचालिका रश्मी बागल, मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल, विद्या विकास मंडळाचे सचिव व आदिनाथचे प्रशासकीय संचालक विलासराव घुमरे, जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, भाजपा तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, भाजपाचे राज्य निमंत्रित कार्यकारणी सदस्य दीपक चव्हाण आदी उपस्थित होते.

करमाळा येथील बागल यांच्या निवासस्थानी खासदार निंबाळकर यांनी सदिच्छा भेट दिली. चिवटे यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन स्वीयसहाय्यक शेखर जोगळेकर यांनी केले. कार्यक्रमास मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकर, आदिनाथचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे, मार्केट कमिटीचे माजी व्हाईस चेअरमन चिंतामणी जगताप, माजी व्हाईस चेअरमन केरू गव्हाणे, भाजपा तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, राज्य निमंत्रित भाजपा सदस्य दीपक चव्हाण, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, शषिकांत पवार, माजी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, जितेश कटारिया, नरेंद्र ठाकूर, प्रज्ञा सेलचे जिल्हाध्यक्ष सुहास घोलप, महिला मोर्चा करमाळा तालुकाध्यक्ष रेणुका राऊत, लक्ष्मण केकान, नितीन झिंजाडे, माळशिरस तालुका भाजपा विस्तारक संजय घोरपडे, उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष संतोष कुलकर्णी, बाळासाहेब कुंभार, माजी सभापती भाग्यश्री शिंदे, रसिका महाडिक, सोनाली डावरे, साधनाताई खरात, माजी नगरसेविका राजश्री माने आदी उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *