Farmers should take advantage of integrated horticulture development campaign schemes

सोलापूर : जिल्ह्यात फलोत्पादन व भाजीपाला पिकांचे क्षेत्र तसेच उत्पादन वाढविण्याकरीता कृषी विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना राबविण्यात येत असून, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टल http://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डी. एस गावसाने यांनी केले आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम 2023- 24 या योजनेसाठी जिल्हयास रक्कम 1486.31 लाख कार्यक्रम राबविण्यास मान्यता प्राप्त झाली आहे. मंजुर कार्यक्रमापैकी अनुसूचित जाती प्रवर्गास रक्कम 88.87 लाख व अनुसूचित जमाती प्रवर्गास रक्कम 63.87 लाख कार्यक्रम मंजूर आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गंत ड्रॅगन फ्रूट, ॲवोकॅडो, सुटी फुले, मसाला पिके, फळबाग पुनरूज्जीवन, सामुहिम शेततळे, शेततळे अस्तरिकरण, शेडनेट हाऊस, हरतिगृह , प्लास्टिक मल्चिंग, डाळिंब पिकासाठी अँटी हेलनेट कव्हर, मधुमक्षिक वसाहत व मधुमक्षिका संच, ट्रॅक्टर 20 एच पी पर्यंत, पॉवर टिलर 8 एचपी पेक्षा जास्त व कमी. पिक संरक्षण उपकरणे, पॅक हाऊस, पुर्व शितकरण गृह, शीत खोली, शीतगृह,रेफरव्हॅन, रायपनिंग चेंबर, प्राथमिक प्रक्रिया केंद्र एकात्मिक शीत साखळी, कांदाचाळ, स्थाई व फिरते विक्री केंद्र- शितचेंबरच्या सुविधेसह, द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर व भाजीपाला रोपवाटीका इत्यादी घटकांसाठी अनुदान देय आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांचे नावे स्वत:ची शेतजमीन असणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक आहे. जिल्हयातील अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती व इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टल http://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी संबंधीत नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी. एस. गावसाने यांनी केले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *