करमाळा (सोलापूर) : करमाळा- जामखेड रस्त्यावर पावसाने खड्डे पडले आहेत. हे खड्डे त्वरित बुजवून घ्यावेत, अशी मागणी केली जात आहे. गेल्यावर्षी पावसाळा झाल्यानंतरही काही ठिकाणचे खड्डे बुजवण्यात आले नव्हते. काही ठिकाणी खड्डे बुजवले तेही व्यवस्थित बुजवले नव्हते. त्यामुळे पुन्हा खड्डे पडले आहेत, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने हे खड्डे त्वरित बुजवावेत अशी मागणी केली जात आहे.
करमाळा- जामखेड रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा आहे. ऊस गाळप हंगाम सुरु झाल्यानंतर येथून मोठ्याप्रमाणात उसाचे ट्रॅक्टर जातात. मात्र यावर्षी मोठाले खड्डे पडले असल्याने वाहतूक करणे अवघड होणार आहे. प्रधान ओढा, पोथरे येथील कॅनल, महात्मा फुले संस्था, सिंधडी वस्ती येथे मोठे मोठ्याप्रमाणात खड्डे आहेत. याकडे गांभीर्याने पाहून खड्डे बुजवावे अशी मागणी केली जात आहे.