Finance Account with Ajit Pawar So is the allocation of accounts of the State Cabinet with reshuffle

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (शुक्रवारी) खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी याला मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे अर्थ खाते आले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ व नियोजन हे खाते राहील.

इतर मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे:
छगन भुजबळ : अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, दिलीपराव वळसे पाटील : सहकार, राधाकृष्ण विखे पाटील : महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास. सुधीर मुनगंटीवार : वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय. हसन मुश्रीफ : वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य. चंद्रकांत पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य. विजयकुमार गावित : आदिवासी विकास. गिरीष महाजन : ग्रामविकास आणि पंचायत राज, पर्यटन. गुलाबराव पाटील : पाणीपुरवठा व स्वच्छता. दादाजी भुसे : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम). संजय राठोड : मृद व जलसंधारण. धनंजय मुंडे : कृषि. सुरेश खाडे :
संदीपान भुमरे : रोजगार हमी योजना व फलोत्पादन. उदय सामंत : उद्योग. प्रा. तानाजी सावंत : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण. रवींद्र चव्हाण : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून). अब्दुल सत्तार : अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन. दीपक केसरकर : शालेय शिक्षण व मराठी भाषा. धर्मरावबाबा आत्राम : अन्न व औषध प्रशासन. अतुल सावे : गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण. शंभूराज देसाई : राज्य उत्पादन शुल्क. अदिती तटकरे : महिला व बालविकास. संजय बनसोडे : क्रीडा व युवक कल्याण, बंदरे. मंगलप्रभात लोढा : कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता. अनिल पाटील : मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *