dattakala group of institutionsdattakala group of institutions

पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला काही कारणास्तव प्रवेश मिळाला नाही तर अशा विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमालाही प्रवेशाची संधी असते, अशी माहिती स्वामी चिंचोली (भिगवण) येथील दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी दिली.

काही वर्षातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या स्थितीचा आढावा घेतला असता असे निदर्शनास येते की, पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम पुर्ण केलेल्या विद्यार्थ्याची संख्या जास्त असते परंतु थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी मोजक्याच जागा असल्याने विद्यार्थ्यांची इच्छा असुन देखील पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येत नाही. त्यामुळे विद्यार्थी इतर अभ्यासक्रमाचा पर्याय निवडतो किंवा नोकरी करण्याचा पर्याय निवडतो. परंतु थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकीच्या जागा पुर्णपणे भरलेल्या असल्यामुळे एखाद्या विद्यार्थ्यांला पदवी अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यावयाचे असेल तर सदर विद्यार्थ्यांला सीईटी प्रवेश परिक्षा न देता देखील पदविका अभ्यासक्रमाच्या मार्कावर (कमीत कमी ४५ टक्के व ४० टक्के मार्क मागासवर्गीय उमेदवारासाठी) प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीला देखील प्रवेश घेता येतो.

यासंबंधीची माहिती अनेक पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना नसल्यामुळे बहुतांश विद्यार्थी पदवी अभियांत्रिकी प्रवेशापासून वंचित राहत आहेत. सध्या अशी परिस्थिती कॉम्प्युटर व आयटी या शाखांसाठी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबत निर्माण झालेली आहे. मागील दोन वर्षात म्हणजेच कोरोनाचा काळ संपल्यानंतर कॉम्प्युटर व आयटी या शाखांना प्रवेश घेण्याऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे प्रथम वर्षाची प्रवेश क्षमता पुर्णपणे भरलेली जात असुन कॉम्प्युटर व आयटीच्या थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी अत्यंत कमी जागाच प्रवेशासाठी शिल्लक राहत आहेत असे ते पुढे म्हणाले.

ज्या पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकीला प्रवेश मिळालेला नाही. अशा सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठीच्या पर्यायाबाबत देखील जरूर विचार करावा व सध्या प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कडून प्रवेशासाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असुन ३ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरू राहणार आहे. तरी अशा सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षेच्या संकेतस्थळावर जावून नोंदणी करून घेण्याचे आवाहन प्रा. झोळ यांनी केले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *