Food and Drug Administration action 76 lakh 43 thousand worth of inferior betel nuts seized

सोलापूर : अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत ७६ लाख ४३ हजाराची निकृष्ट सुपारी जप्त केली आहे. विशेष भरारी पथकातील अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सोलापूर येथील मार्केट यार्ड चौकामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. अशोक लेलंडने (KA14 C 7515, KA-14 C 0850 व KA14, C 4619) या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये रंगमिश्रीत व किटकबाधीत सुपारीची वाहतुक होत असल्याचे आढळून आले.

सदर ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकारी रेणुका पाटील यांनी किटकबाधीत व रंग मिश्रीत सुपारी या अन्न पदार्थाचे नमुने घेऊन उर्वरित 73 हजार 495 किलो किंमत 76 लाख 43 हजार 37 रुपयाचा साठा कमी दर्जाच्या संशयावरुन जप्त करुन ताब्यात घेतला असून, सदर प्रकरणी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत पुढील कारवाई सुरु आहे. सदरची कारवाई विशेष भरारी पथकाचे सहायक आयुक्त श्री. साहेब देसाई, अन्न सुरक्षा अधिकारी श्री. मंगेश लवटे, उमेश भुसे व श्रीमती रेणुका पाटील तसेच नमुना सहाय्यक श्रीशैल हिटनळ्ळी, यांच्या पथकाने केली.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *