करमाळा (अशोक मुरूमकर) : भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (मंगळवारी) जगताप गटाचा सटवाई निवासस्थान येथे प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्याला शेकडो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून जगताप गटाचा हा पहिलाच मेळावा होता. या मेळाव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जगताप गटाचा स्नेह मेळावा महत्वाचा मानला जात आहे. या मेळाव्याला खासदार निंबाळकर हे प्रमुख उपस्थित होते. मंचावर माजी आमदार जयवंतराव जगताप, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप, भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, राजकुमार पाटील, माजी नगरसेवक नारायण जगताप, धनश्री खटके, संगीता नष्टे आदी उपस्थित होते.

या मेळाव्याला कात्रज येथील बाजार समितीचे नागनाथ लकडे, आळजापूर येथील बिभीषण खरात, कंदरचे अण्णा पवार, निभोरेंचे सरपंच रविंद्र वळेकर, कामोणेचे सरपंच रमेश खरात, आमदार शिंदे यांचे समर्थक सुजित बागल, वंजारवाडीचे सरपंच किरण फुंदे, बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षीरसागर, पप्पू उकिरडे, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, तालुकाध्यक्ष रामा ढाणे यांच्यासह बिटरगाव श्री, खडकी, आळजापूर, पोटेगाव, बोरगाव, शेटफळ, रावगाव, पांडे येथील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक शंभूराजे जगताप यांनी केले. माजी आमदार जगताप, खासदार निंबाळकर, श्री. राखुंडे, यूसुप पठाण व कंदरचे अण्णा पवार यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. श्री. भागडे यांनी सूत्रसंचालन केले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *