करमाळा (अशोक मुरूमकर) : कोरोना काळात राज्यभर प्रसिद्ध झालेले राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी आज (शनिवारी) करमाळ्यात हॉटेल आराध्या येथे काही कार्यकर्त्यांशी औपचारिक संवाद साधला. एका कार्यक्रमानिमित्त जात असताना ते चहा- पानसाठी थांबले होते. तेव्हा तेव्हा त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला.
आमदार नीलेश लंके यांनी कोरोना काळात उत्कृष्ट काम केले होते. त्यामुळे ते राज्यभर प्रसिद्ध झाले होते. राष्ट्रवादीचे करमाळा तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी त्यांच्याच प्रेरणेने करमाळ्यात कोरंटाईन सेंटर सुरु केले होते. आमदार लंके यांना अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस देऊ शकते, असे कयास लावले जात आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आमदार लंके यांना तसा शब्दही दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत विखे विरूद्ध लंके अशी लढत होण्याची चिन्हे आहेत. याबाबत त्यांना करमाळा येथे पत्रकार अशोक मुरूमकर यांनी प्रश्न केला मात्र त्यावर त्यांनी कॉमेंट्स म्हणत विविध विषयांवर संवाद साधला.
वारे यांनी त्यांचे स्वागत केले. सोलापूर व नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या महामार्गाचा प्रश्न मार्गी लागल्याने प्रवास सुखकर होणार आहे. केंद्रीय मंत्री गडकरी, शरद पवार व आमदार रोहित पवार यांच्याकडे याबाबत कसा पाठपुरावा झाला यावरही येथे चर्चा झाली. देशातील राजकीय परस्थितीबाबत यावेळी चर्चा झाली. वारे यांनी सर्व कार्यकर्त्यांची ओळख करून दिली. माजी नगरसेवक अतुल फंड, अरुणकाका जगताप, ऍड. नितीन गपाट, बिटरगाव श्री येथील प्रवीण मुरूमकर, श्रीकांत ढवळे, लालासाहेब शिंगटे, दादासाहेब कदम, संतोष लाड, शैलेश घाडगे आदी यावेळी उपस्थित होते.