Shivsena distributed materials to 227 construction workers in Karmala

करमाळा (सोलापूर) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्यांसाठी अनेक योजना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे अवश्यक आहे. सर्वसामान्य अडचणीतल्या लोकांना केलेली मदत हीच खरी आयुष्याची संपत्ती आहे, असे मत ऍड. बाबुराव हिरडे यांनी व्यक्त केले.

शिवसेनेच्या वतीने 227 बांधकाम कामगारांना साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ऍड. हिरडे बोलत होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वांगडे, प्रा. अशोक नरसाळे, पत्रकार नासिर कबीर, विधानसभाध्यक्ष राहुल कानगुडे, तालुका प्रमुख देवानंद बागल, जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे, उप तालुकाप्रमुख दादासाहेब थोरात, शहर प्रमुख नागेश गुरव, आजिनाथ इरकर, शाखाप्रमुख निलेश चव्हाण, शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख ज्योती शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

ऍड. हिरडे म्हणाले, समाजात काम करताना अडचणीतल्या माणसाला मदत करण्याची ज्याच्या मनात भावना असते व त्यासाठी आपला वेळ खर्च करण्याची तयारी असते, अशा लोकांच्या माध्यमातूनच समाजसेवा होऊ शकते. सरकारी योजना अनेक असतात पण त्या नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी निर्माण झालेली दलालांची साखळी ही लाभार्थ्यांना अडचणीत आणते. यामुळे दलालाची साखळी मोडून सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांची काम करण्यासाठी प्रयत्न घेणे गरजेचे आहे. वैद्यकीय क्षेत्रात सर्वसामान्यपर्यंत मदत पोहोचवण्याचे काम करणाऱ्याचे काम मंगेश चिवटे हे करत असून ते मुख्यमंत्री शिंदे यांचे विश्वासू शिलेदार आहेत याचा करमाळा तालुकावासियांना अभिमान आहे.

जिल्हाप्रमुख चिवटे म्हणाले, करमाळा तालुक्यात दोन हजार बांधकाम कामगार नोंदणी करून त्यांना प्रत्यक्षात लाभ दिला आहे. याशिवाय त्यांच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व घरकुल मिळून घेण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *