करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची शिवसेनेची आज (मंगळवार) पहिली प्रचारसभा रंभापूरा येथे झाली. या प्रचारसभेत माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे प्रमुख भाषण झाले.
त्यांच्या भाषणातील मुद्दे
१) रंभापूरा हे माझ्या आजीचे माहेर आहे. येथेच पहिली प्रचारसभा घेऊन, चांगले उमेदवार विजयी करण्याचे आवाहन करत आहे, असं म्हणून उपस्थितांना मतदान करण्याचे भावनिक आवाहन
२) स्वच्छतेची जबाबदारी ही नागरिकांचीही आहे. आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसं शहरही स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. चार वर्ष झाले पालिकेवर प्रशासकी आहे. माग विरोधकांनी प्रश्न का मांडला नाही? असा प्रश्न त्यांनी याबाबत केला.
३) आम्ही संस्थेत पारदर्शकपणा ठेवला असं म्हणून उमेदवारांची तुलना करून मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले.
४) सावकारकी, बेकायदा व्यवसाय यावरही त्यांनी भाष्य केले. तालुक्याचा मी लोकप्रतिनिधी होतो तेव्हा सर्व बेकायदा व्यवसाय मी बंद केले होते. मात्र आता काय स्थिती आहे असा प्रश्न त्यांनी केला. शिवसेनेच्या उमेदवारांकडून काम करून घेण्याची जबाबदारी माझी राहील. तुम्ही फक्त त्यांना विजयी करा., असं ते म्हणाले आहेत.
५) आता जे विरोधात आहेत ते जगताप गटापासूनच तयार झाले आहेत. याचे भान त्यांनी ठेवले पाहिजेत. हे सांगताना वस्ताद एक डाव राखून ठेवत असतो. त्यामुळे माझ्यावर बोलताना भान ठेवा. चौकातील सभेत मी सविस्तर बोलणार आहे, असं म्हणून त्यांनी विरोधकांना इशाराही दिला आहे.
