करमाळा (सोलापूर) : पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोमवारी (ता. 4) सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे करमाळा पंचायत समिती येथे उजनी धरणासाठी पुनर्वसित झालेल्या गावातील सुविधांबाबत होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी (पुनर्वसन) तुषार ठोंबरे व जिल्हा पुनर्वसन अधिकारी टोणपे यांच्यासह प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर व प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांसमवेत ही बैठक होणार होती. आमदार संजयमामा शिंदे यांच्या सूचनेही बैठक होणार होती. मात्र पालकमंत्री पाटील यांच्या दौऱ्यामुळे व जिल्हाधिकारी पदाचा पदभार ठोंबरे यांच्याकडे असल्याने रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती टोणपे यांनी दिली आहे.
By kaysangtaa.21
पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४