Former MLA Jayvantrao Jagtap is the Speaker for the sixth time and Shailja Meher has the honor of becoming the Deputy Speaker for the first timeFormer MLA Jayvantrao Jagtap is the Speaker for the sixth time and Shailja Meher has the honor of becoming the Deputy Speaker for the first time

करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माजी आमदार जयवंतराव जगताप व उपसभापतीपदी शैलजा मेहेर यांची आज (मंगळवारी) बिनविरोध निवड झाली आहे. विजयादशमी दसऱ्याच्या मुर्हूतावर ही निवड झाली असून निवड होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत जगताप यांचा सत्कार करण्यासाठी बाजार समितीच्या आवारात गर्दी केली केली. जगताप हे सहाव्यांदा सभापती झाले आहेत. तर मेहेर यांना प्रथमच महिला उपसभापती होण्याचा मान मिळाला आहे.

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहास प्रथमच यावेळी निवडणूक बिनविरोध झाली होती. निवडणूक निर्णय अधिकारी आबासाहेब गावडे यांच्या अध्यक्षतेखाली आज संचालक मंडळाची सभापती व उपसभापती निवडीसाठी बैठक झाली. बाजार समितीच्या सभागृहात ही बैठक झाली. सभापती पदासाठी माजी आमदार जगताप व उपसभापती पदासाठी मेहेर यांचा एकमेव अर्ज आले.
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी जयवंतराव जगताप

करमाळा बाजार समितीवर जगताप गटाचे सुरुवातीपासून वर्चस्व असून सर्वाधिक काळ म्हणजे २९ वर्षे जगताप यांनी बाजार समितीचे सभापतीपद भूषविले होते. गेल्या पंचवार्षिकमध्ये प्रा. शिवाजी बंडगर हे सभापती होते. यापूर्वी झालेला वाद आणि राजकीय परिस्थिती पहाता यावेळी निवडणूक बिनविरोध झाली हे विशेष मानले जात आहे.
करमाळ्याच्या राजकारणात जगताप ‘किंग’! बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करणारा ‘मेकर’ कोण? ‘या’ सहा मुद्यांवर झाले काम

या सभेवेळी बाजार समितीचे संचालक शंभूराजे जगताप, महादेव कामटे, जनार्धन नलवडे, रामदास गुंडगीरे, सागर दोंड, तात्यासाहेब शिंदे, नागनाथ लकडे, शिवाजी राखुंडे, साधना पवार, नवनाथ झोळ, काशीनाथ काकडे, कुलदीप पाटील, बाळू पवार, मनोज पितळे, परेश दोशी, वालचंद रोडगे उपस्थित होते. माजी आमदार यांचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, खासदार रणजीतसिह नाईक निंबाळकर, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण पाटील, बागल गटाचे दिग्विजय बागल यांनी अभिनंदन केले आहे. ॲड. कमलाकर वीर, पत्रकार आण्णासाहेब काळे, नवनाथ झोळ, बबनराव मेहेर, सागर दोंड यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक अशोक नरसाळे यांनी केले. तर आभार सचिव विठ्ठल क्षिरसागर यांनी मानले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *