Video : माजी आमदार जगताप यांचा शिवसेनेत प्रवेश : वाचा पहिली प्रतिक्रिया

करमाळा (अशोक मुरूमकर) : माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल (मंगळवारी) शिवसेनेत प्रवेश केला. जिल्हा प्रमुख महेश चिवटे, शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. त्यानंतर माजी आमदार जगताप यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलला पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

माजी आमदार जगताप म्हणाले, ‘नागरिकांची कामे करण्यासाठी मी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे तालुक्यातील माझ्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांची व तालुक्याची विकास कामे होणार आहेत. जिल्ह्यातील आमचा जुना ग्रुप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे.’

माजी आमदार जगताप यांनी मुंबई येथील ‘मुक्तागिरी’ निवासस्थानी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. ते दोन वेळा करमाळ्याचे आमदार होते.1990 मध्ये अपक्ष तर 2004 मध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर ते आमदार झाले होते. 2019 मध्ये विधानसभेला माजी आमदार संजयमामा शिंदे यांना विजयी करण्यात व 2024 मध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नारायण पाटील यांना विजयी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेला मोठा फायदा होणार आहे.

सविस्तर व्हिडिओ पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *