करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून माजी आमदार नारायण पाटील यांनी आज (गुरुवारी) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी त्यांनी हा अर्ज दाखल केला आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सविता देवीराजे भोसले, बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, नवनाथ झोळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, देवानंद बागल उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड यांनी हा अर्ज स्वीकारला. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ठोकडे हे देखील उपस्थित होत्या.
माजी आमदार नारायण पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
