नागपूर : नागपूर येथे गुरुवारपासून (ता. ७) हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शिंदे सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला आहे. अधिवेशनाच्या कामकाजाचा कालावधी अत्यंतकमी असून सध्या शेती व आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा असून त्यावर चर्चा कशी केली जाणार असा प्रश्न विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवर यांनी केला आहे. (The opposition party boycotted the tea party called by the government on the eve of the session)
विरोधी पक्षाने पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व राष्ट्रवादी (शरद पवार गटाचे जयंत पाटील यावेळी उपस्थित होते. नागपुरात होणाऱ्या अधिवेशनाच्या कामकाजाचा कालावधी कमी आहे. त्या कालावधीत राज्यातील प्रश्नांना सरकार न्याय देऊ शकणार नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून चहापानावर बहिष्कार टाकला आहे, असेही वड्डेटीवर यांनी म्हटले आहे.