करमाळा (सोलापूर) : करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती अतुल पाटील यांचा आज (रविवार) पुण्यात ‘मल्हाररत्न’ पुरस्काराने सन्मान होणार आहे. पुण्यश्लोक फाऊंडेशनच्या वतीने श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त पुरस्कार दिला जाणार आहे. पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृह येथे सांयकाळी ५ वाजता या पुस्काराचे वितरण होणार आहे.
अतुल पाटील हे शिवछत्रपती पुरस्कार विजेते आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रकाश महानवर हे असणार आहेत. कार्यक्रमाचे उदघाटन डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे. आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे, अर्जुन केसरी काकासाहेब पवार व शांताराम जाधव यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावेळी इतरही पुरस्कार दिले जाणार असल्याचे संयोजक धनंजय तानले यांनी सांगितले आहे.