करमाळा (अशोक मुरूमकर) : पोथरे येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रा उत्सव समिती व ग्रामस्थांच्या वतीने आज (मंगळवारी) सायंकाळी चौघांचे विशेष सन्मान होणार आहेत. ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहातील हे सन्मानार्थी आहेत. यामध्ये प्रकाश ननवरे यांचा ‘जीवनगैरव’ पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे. तर वायरमन शरद झिंजाडे, दत्तात्रय सावंत व अजिनाथ महाराज कडू यांचा ‘श्री भैरवनाथ सेवा सन्मान’ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

