करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पाथुर्डी येथे ग्रामपंचायत कार्यालयात आयुष्यमान भव मोहिमेअंतर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. हे शिबिर केम येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व पाथुर्डी ग्रामपंचायतच्या वतीने केले. या शिबिरामध्ये गावातील 105 रुग्णांची बीपी, शुगर व इतर आजारांची तपासणी करून किरकोळ औषध उपचार करण्यात आला. यावेळी पत्रकार शितलकुमार मोटे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घघाटन करण्यात आले.
यावेळी हे शिबीर यशस्वी करण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी निलेश कुबेर, आरोग्य निरीक्षक अनिल तोडकरी, आरोग्य सेवक दत्ता कावळे, आरोग्य सेविका वर्षा पोद्दार व आशा कर्मचारी भागुबाई हुलगे व श्रीमती खरात, ग्रामपंचायत कर्मचारी दीपक मोटे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी सरपंच रुक्मिणी मोटे, उपसरपंच प्रकाश खरात, ग्रामपंचायत सदस्य आशा तोडेकर, सचिन चांगण, चांगदेव कानडे, विकास सोसायटीचे संचालक चांगदेव मोटे, सदाशिव तोडेकर, धनाजी मोटे, शिवाजी पाडुळे, प्रकाश वैद्य, श्रीमंत मोटे, अंकुश दरगुडे, तानाजी मोटे आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.