Fill all the ponds falling under Kukdi benefit area in Karmala taluka with MangiFill all the ponds falling under Kukdi benefit area in Karmala taluka with Mangi

करमाळा (सोलापूर) : कुकडी धरण परिसरात सुरु असलेल्या पावसाने धरण पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे यातील ओव्हरपोलोच्या पाण्यानी करमाळा तालुक्यातील मांगी तलावासह लाभक्षेत्रातील तलाव भरून घ्यावेत. यासाठी आपण पाठपुरावा करत असून आमदार संजयमामा शिंदे व आमदार रोहित पवार यांच्याशीही व संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा समनव्यय ठेवणार आहे, असे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे.

वारे म्हणाले, करमाळा तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे ओढे, नाले व तलाव कोरडे आहेत. पाऊस नाही झाला तर शेतकरी अडचणीत येणार आहे. ही अडचण होऊ नये म्हणून कुकडी लाभक्षेत्रातील तलाव भरून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी राष्ट्रवादीकडून पाठपुरावा सुरु आहे. पाण्यासाठी राजकारण बाजूला ठेऊन योग्य त्या सर्वांकडे पाठपुरावा केला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *