करमाळा (सोलापूर) : माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कंदर येथील पदम पंडित प्रतिष्ठानच्या वतीने केम येथील अभिमन्यू शिक्षण प्रसारक मंडळ प्राथमिक व माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग व पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पवार, पोलिस उपनिरीक्षक अभिमान गुटाळ, मंडळ अधिकारी मीरा नागटिळक, केम येथील अजितदादा पवार माध्यमिक विद्यालयचे अध्यक्ष मारुती पारखे, सरपंच विलास राऊत पाटील, प्रहारचे तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, चेअरमन सुदर्शन तळेकर, सागर कुरडे, गोरख पारखे, करमाळा तालुका सावता माळी परिषदेचे अध्यक्ष दुधे, गणेश तळेकर, कांतीलाल पवार, वैजनाथ गुरव, मुख्याध्यापक नितीन जगताप, सहशिक्षक देविदास यादव आदी उपस्थित होते. आभार काकासाहेब तळेकर यांनी मानले.
माजी आमदार शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत स्कुल बॅग वाटप
