Send Nimbalkar from Madhya to Lok Sabha to support PM Narendra Modi

करमाळा (सोलापूर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यासाठी माढ्यातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा लोकसभेत पाठवा, असे आवाहन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांनी केले.

भाजपचे गणेश चिवटे यांच्या नेतृत्वात करमाळ्यात (काल रविवारी) बूथ अध्यक्षाचा मेळावा झाला. कर्जतकर म्हणाले, कार्यकर्ता ही भाजपाची ताकद आहे. चिवटे यांच्या नेतृत्वात करमाळ्यातून चांगल लीड मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. देशात लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्याविरुद्ध राहुल गांधी अशी लढत आहे. निंबाळकर यांचे मत मोदींना मिळणार आहे, असेही ते म्हणाले.

चिवटे म्हणाले, निंबाळकर यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील रस्ते व पाण्याचे प्रश्न मार्गी लागले आहेत. या मेळाव्यास भाजप प्रदेश महिला उपाध्यक्षा रश्मी बागल उपस्थित होत्या. यावेळी संतोष वाळुंजकर, संतोष कुलकर्णी, भगवानगिरी गोसावी, अमोल पवार, नितीन झिंजाडे आदींची भाषणे झाली. यावेळी तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अगरवाल, जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, सरचिटणीस काकासाहेब सरडे, डॉ. अभिजीत मुरूमकर, विनोद महानवर, प्रवीण बिनवडे, दौलत वाघमोडे, सोमनाथ घाडगे, अशोक ढेरे, उमेश मगर, लक्ष्मण शेंडगे, बिभीषण गव्हाणे, रेणुका राऊत, राधिका डोके, संगीता नष्टे, राजश्री खाडे , भैया गोसावी, हर्षद गाडे, धर्मराज नाळे, दादासाहेब देवकर, मच्छिंद्र हाके, जयसिंग भोगे, किरण शिंदे, विष्णू रंदिवे, हरिभाऊ झिंजाडे , नवनाथ नागरगोजे, नितीन निकम, नाना अनारसे, अमोल जरांडे, सयाजी जाधव आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन भगवानगिरी गोसावी यांनी तर आभार अजिनाथ सुरवसे यांनी मानले. कार्यक्रमासाठी करमाळा तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी सर्व बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *