करमाळा (सोलापूर) : येथील कै. बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठानने गरजू रुग्णांच्या सोईसाठी मोफत अत्याधुनिक बेड उपलब्ध करून देण्याचा अनोखा उपक्रम राबविला आहे. या सेवेचा लोकार्पण सोहळा उद्या (ता. १०) सायंकाळी ७ वाजता आयोजित केला आहे, तरी शहरातील सर्व शिवप्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे तसेच गरजु रुग्णांनी यासेवेचा लाभ घेण्याचे आवाहन कै. बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
हा सोहळा करमाळा शहरातील छत्रपती चौक येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या हस्ते होणार आहे. तरी करमाळा शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे तसेच गरजु रुग्णांनी यासेवेचा लाभ घेण्याचे आवाहन कै. बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन गायकवाड यांनी केले आहे.