SubExecutive Engineer Jadhav felicitated on behalf of Swabhimani Farmers Association at the office of MSEBSubExecutive Engineer Jadhav felicitated on behalf of Swabhimani Farmers Association at the office of MSEB

करमाळा (सोलापूर) : महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता सुमीत जाधव यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज (शनिवारी) सत्कार करण्यात आला. करमाळा कार्यालय येथे हा सत्कार करण्यात आला. त्यांची बदली झाल्यामुळे त्यांचा हा सत्कार करण्यात आला. 2019 पासून सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते कायम तत्पर होते. कुठेही दुजा भाव न करता सर्वांना समान न्याय दिला. रावगाव सबस्टेशनसाठी त्यांनी परिश्रम घेतले.

जाधव यांनी आजपर्यंत निस्वार्थपणे काम केल्याने त्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटना, रावगाव ग्रामपंचायत, फुंदेवाडी ग्रामपंचायत व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, रावगाव ग्रामपंचायत सरपंच दादासाहेब जाधव, फुंदेवाडी ग्रामपंचायत सरपंच किरण फुंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक शिंदे, युवाध्यक्ष अमोल घुमरे, बलभिम धगाटे, राहूल पवार, विज वितरणचे अधीकारी पवार व पंत कानडे, प्रवीण केकान, पवण पवार उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *