करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील घोटी येथे ग्रामीण भागातील मुला- मुलींना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी सुसज्ज अभ्यासिका तयार करण्यात आली होती. सध्या मुलींसाठीही स्वतंत्र अभ्यासिका करण्याची आवश्यकता निर्माण झाली असून त्यासाठी घोटीमध्ये स्पर्धा परीक्षा पोलिस भरती व इतर परीक्षा तयारीसाठी मुली व महिलांसाठी स्वतंत्र नवीन अभ्यासिका सुरू होत आहे.
येथे घोटी, साडे, वरकुटे, मलवडी, पाथर्डी, निंभोरे, आळसुंदेसह परिसरातील मुली व महिलांनी या अभ्यासिकेमध्ये मोफत प्रवेश देण्यात येत आहे. त्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. जागा मर्यादित आहेत त्यामुळे प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. ही अभ्यासिका मुली व महिलांसाठी मोफत आहे. संपर्क : श्री. दुधे – 9657695787, श्री. शेंडे – 9075763343 व श्री. थोरात – 7721073943.
