गजानन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने मेजर कांबळे यांचा करमाळ्यात सत्कार

Gajanan Sports Club felicitated Major Kamble in Karmala

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील सुमंतनगर येथील अमोल कांबळे यांचा देशसेवेतून सेवानिवृत्त झाल्यामुळे सत्कार करण्यात आला आहे. वेताळ पेठ येथील गजानन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने हा सत्कार करण्यात आला आहे. सेवानिवृत्त कांबळे हे बालपणापासून गजानन स्पोर्ट्स क्लबचे सदस्य आहेत.

देशसेवा बजावत असतानाही करमाळ्यात आल्यानंतर ते गजानन स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्यात पुढाकार घेत होते. मेजर अमोल कांबळे हे सेवानिवृत्त झाले असून त्यांचे वडील देखील मेजर होते. यांचा करमाळा येथे नागरी सत्कार करण्यात आला. गजानन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने सत्कार झाला. तेव्हा समीर बागवान, चेतन ढाळे, दिगंबर ठोंबरे, चिन्मय मोरे, राहुल किरवे, शरीफ दारूवाले आदी उपस्थित होते. करमाळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे व शिक्षण समितीचे माजी सभापती प्रकाश बलदोटा यांच्या हस्ते हा सत्कार झाला.

Discussion in the political circles on Mohite Patil entry into the Madha Lok Sabha constituency

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *