करमाळा (सोलापूर) : अंधश्रद्धा निर्मूलन समिती व नगरपालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या गणपती व निर्माल्य दान उपक्रमाला करमाळ्यात चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये नागरिकांनी व छोट्या बालकांनीही गणपतीमूर्ती व निर्माल्य दान केले. नगरपालिका मुला- मुलींची शाळा नंबर ४ येथे हा उपक्रम राबविण्यात आला.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभाग नोंदवत रामचंद्र बोधे व पांडुरंग वीर यांचा घरगुती गणपती दान घेतला. सोलापूर जिल्ह्याचे अंनिसचे जिल्हा सचिव अनिल माने यांनी गणपती दान व निर्माल्य दान मागचा उद्देश सांगितला. या विषयावर आधारित त्यांनी चळवळ गीत सादर केले. गणेश विसर्जन मार्गावरती करमाळा नगरपालिकेजवळ मंडप उभारण्यात आला होता. येथे गणेश मंडळाचे स्वागत करण्यात आले.
करमाळा शहरातील भाऊराव शेळके, ओमराजे शेळके, अखिलेश कांबळे, शंभूराजे वगरे, संदीप शिर्के, रणवीर खिल्लारे, अतुल दुधे, लक्ष्मण भंडारे, राजाभाऊ गुंजेगावकर, वैभवी विधाते यांनी गणपती दान व निर्माल्य दान केले. करमाळा नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक सोमनाथ सरवदे, अंनिसचे करमाळा तालुका कार्याध्यक्ष दिगंबर साळुंके, प्राचार्य नागेश माने, ज्येष्ठ कवी प्रकाश लावंड, संजय हंडे, संतोष कांबळे, चंद्रकांत पवार, आप्पासाहेब लांडगे, मोरेश्वर पवार, राजेंद्र साने, सुनील गायकवाड, मुकुंद मुसळे, बाळासाहेब दुधे, संतोष माने, विक्रम राऊत, चंद्रकला टांगडे, अर्चना ताटे, शाळा नंबर ४ चे सर्व शिक्षक, गंगाराम तालीम मित्रमंडळाचे अमोल लावंड, नगरपालिकेचे प्रदीप शिंदे, विक्रम कांबळे, अनुप कांबळे, महादेव कांबळे, प्रदीप चौकटे, प्रशांत खारगे, दत्तात्रय घोलप, गजानन राक्षे, मल्हारी चांदगुडे, बाळनाथ क्षीरसागर, नंदू कोरपे, किरण कोरपे, प्रणित कांबळे, विक्रम कांबळे, जब्बार खान, राजेंद्र झाडबुके, बद्रीनाथ गायकवाड, अमोलसिद्ध परशेट्टी आदी यावेळी उपस्थित होते.