Video ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या गणरायाचे विसर्जन

Ganaraya immersion of the Global Science Institute

करमाळा (सोलापूर) : येथील ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या गणरायाचे भव्य मिरवणुकीने आज (सोमवारी) विसर्जन झाले. डीजेच्या तालात लेझीम खेळत श्री गणेशाची मिरवणूक निघाली. यावेळी सामाजिक संदेश देणारे फलक लक्ष वेधत होते. ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे प्रमुख महेश निकत यांच्या मार्गदर्शनाखाली ही मिरवणूक निघाली.

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट येथे श्री गणरायाची आरती करून गायकवाड चौक मार्गे महात्मा गांधी विद्यालयापासून पुढे जात श्री गणरायाला निरोप देण्यात आला. विद्यार्थ्यांनी लेझीम खेळत आनंद साजरा केला. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गीतावर विद्यार्थ्यांनी लेझीम सादर केले. यावेळी सामाजिक संदेश देणारे फलक लक्ष वेधत होते. चिमुकलेही या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *