प्रांताधिकाऱ्याच्या नियुक्तीबाबत गणेश चिवटे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

करमाळा (सोलापूर) : माढा प्रांताधिकाऱ्याच्या नियुक्तीबाबत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन देत मागणी केली आहे. अनेक दिवसांपासून करमाळा- कुर्डूवाडी विभागामध्ये प्रांताधिकारी नाहीत त्यामुळे नागरिकांची अनेक कामे रखडली आहेत.

चिवटे यांनी पालकमंत्री गोरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करमाळा कुर्डूवाडी विभागांमध्ये अनेक दिवसांपासून प्रांताधिकारी नाहीत. पालकमंत्री गोरे यांनीही या मागणीची दखल घेऊन लवकरच माढा उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ती होईल, असे सांगितले. करमाळा व माढा तालुक्यातील नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारे शासकीय दाखले काढण्यासाठी विलंब होत आहे. शेतकरी व इतर नागरिकांना प्रांताधिकारी नसल्याने नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *