करमाळा (सोलापूर) : चिंचोली (भिगवण) येथील दत्तकला शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राणादादा सुर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आले. यावेळी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, सचिव माया झोळ, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर तसेच संस्थेतील सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याबरोबर राणादादा सुर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त कर्हावागज (ता. बारामती) येथील निवासी मुकबधिर विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रा. प्रिती काळे, प्रा. विपुल त्रिवेदी, प्रा. आशिष जाधव, प्रा. स्नेहल जमदाडे, ज्योती झोरे तसेच मुकबधिर विद्यालयातील सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.