Gas connection to 611 women in Boramani through Ujjwala Yojana

सोलापूर : महिलांच्या सबलीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार वेगवेगळ्या योजना आखत आहे. उज्ज्वला योजनेतून बोरामणीतील ६११ महिलांना गॅस जोडणी देण्याचे काम झाले आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार महिलांमधील दुवा म्हणून आपण सर्व ते सहकार्य करू, असे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी सांगितले.

बोरामणीतील एसव्हीसीएस प्रशालेच्या प्रांगणात यशस्विनी अॅग्रो प्रोड्युसर कंपनी, जय सेवालाल इंडियन गॅस कंपनी अंतर्गत आयोजिलेल्या गॅस वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, महेश साठे, मनीष काळजे, सागर सोलापूरे, वैभव ह्लसगे, सैफन फुलारी, शिवानंद कट्टीमनी, राजकुमार मोरे, लालासाहेब तांबडे, रामचंद्र माळी, संकेत जाधव, पूनम पटले, अंबिका पाटील, सौरभ राउत, श्रीकांत गोसावी, बिपीन करजोळे, परमेश्वर सुतार, सुनील बोराळे, रामचंद्र होनराव, राजकुमार झिंगाडे, धनंजय गाडवे, मधुकर चिवरे, सिद्धाराम हेले, इरेशा अंबारे, मुनिरुदीन पठाण, परमेश्वर कुंभार, सुरेश राठोड, आकाश गिराम उपस्थित होते.

शेतकरी महिला कंपनी, शेतकरी व महिला बचत गटांनी संपूर्ण देशासमोर आदर्श मॉडेल निर्माण केले आहे. अनिता माळगे त्याचे प्रतीक आहेत. जी-२० शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी त्यांना राज्यातून प्रतिनिधीत्व दिले होते, ही अभिमानाची गोष्ट आहे, असे मत आमदार कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले. येत्या काळात आपल्या कार्यामध्ये अडचणी निर्माण करणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. मनीष काळजे यांनी यशस्विनी कंपनीच्या कामाला शुभेच्छा दिल्या. अनिता माळगे यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन बेबीनंदा बिराजदार यांनी तर आभार शाम माळगे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन सुरेखा होडगे, अर्चना जाधव, राजेश्री माळी, अलीमून पटेल, रुबिना नदाफ, पूजा पाटील, रेणुका जाधव, कोमल राठोड, पूजा झुरळे, जयश्री कोरे, शीला बारोळे, अविधा जांभळे, राजेश्री राठोड, शोभा कळके, विद्या बिराजदार, ललिता चव्हाण व शबनम मुजावर यांनी केले.

१२ लाखांचा निधी मंजूर
बोरामणीत महिलाच्या विकासकामासाठी यशस्विनी कंपनीसाठी खासदार डॉ. शिवाचार्य यांनी १२ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे तर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी २५ लाखांचा निवेदन देण्यात आले आहे. महिलांना बैठकीसाठी बोरामणीत जागा उपलब्ध नाही, ती तातडीने उपलब्ध करून देण्याबाबतही आमदार कल्याणशेट्टी यांनी आश्वासन दिले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *