Plantation of banyan trees on the occasion of Vatpurnima in Yashwantrao Chavan CollegePlantation of banyan trees on the occasion of Vatpurnima in Yashwantrao Chavan College

करमाळा (सोलापूर) : येथील विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी, उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक यांच्या सूचनेनुसार यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने वटपौर्णिमेनिमित्त वटवृक्षाची लागवड केली आहे.

‘जगात सर्वात दाट सावली असते वडाची’ वडाच्या पारंब्यामधून अखंड पाणी टपकत असते. त्यामुळे वडाखालील जमीन सदैव ओलसर असते म्हणूनच वडाची सावली अदभूत गुणकारी असते. तसेच विहिरीचे पाणी,वडाची सावली आणि मातीचे घर उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात गरम असते आणि वैज्ञानिक दृष्ट्या विचार करता जगात सर्वाधिक ऑक्सिजनचे उत्सर्जन करणारा वड हा वृक्ष आहे.

वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले होते म्हणूनच आपणही या दिवशी वडाची पूजा करतो.खरे म्हणजे या दिवशी सत्यवान लाकडे तोडताना चक्कर येऊन पडला तेव्हा सावित्रीने त्याला याच वडाच्या झाडाखाली आणले त्यावेळी त्या सावलीत त्या पारंब्यांच्या तुषारात,थंडाव्यात आणि सर्वाधिक ऑक्सिजन युक्त ठिकाणी त्याला आणून पतीचे प्राण वाचवले म्हणूनच त्या वडाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे,निसर्गाला धन्यवाद देणे म्हणजेच आहे वटपौर्णिमा. तसेच पर्यावरण संरक्षण व पर्यावरण संवर्धन काळाची गरज बनली आहे आणि कोरोनाच्या काळात तर सर्वांनाच ऑक्सिजनची किंमत कळाली आहे आणि म्हणूनच आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अशा वृक्षाची लागवड करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा.लक्ष्मण राख, प्रा. सुजाता भोरे, प्रा. मुक्ता काटवटे, प्रा. निता माने, खटके, मेघा कदम, अलका जाधव, जया नलवडे, प्रियंका नलवडे, नितीन कांबळे, प्रा. अमोल कांबळे, एनएसएसचे स्वयंसेवक उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *