करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (सोमवार) मुंबईत २४७ नगरपालिका व १४७ नगरपंचायतीसाठी नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे. १६ नगरपालिकामध्ये नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव असेल. तर ३४ नगरपालिकेसाठी नगराध्यक्षपद हे ओबीसी महिलांसाठी व ६८ नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गाच्या महिलांसाठी राखीव असेल.
करमाळा नगरपालिका नगराध्यक्षपदाचे सर्वसाधारण महिला आरक्षण
